
सावंतवाडी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून उद्या सकाळी ८.४५ वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरीकडे ते प्रयाण करणार आहेत. सकाळी ९.०४ वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच आगमन होणार आहे. सकाळी ९.०५ वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच्या हस्ते होणार आहे. सलग सहाव्यांदा ध्वजारोहणाचा मान मंत्री दीपक केसरकर यांना मिळाला आहे. राज्यमंत्री असताना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ५ वेळा तर कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
सकाळी ०९.३३ वा. पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस कडे प्रयाण करत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय येथील उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत.