शिक्षणमंत्री केसरकरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 14, 2024 07:47 AM
views 256  views

सिंधुदुर्गनगरी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. 

ध्वजारोहणानंतर  सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त मानवंदना होणार आहे.  तरी या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.