
दोडामार्ग : पावसाळा सुरू झाला तरी अत्यावश्यक असलेल्या तळकट - कोलझर पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने त्याचा मोठा फटाका त्या पंचक्रोशीतील गावांना बसला आहे. रविवारी या अर्धवट पुलाच्या ठिकाणी काम सुरू असल्याने रहदारी साठी नदीपात्रात पाईप टाकून उभारलेला तात्पुरता मार्ग वाहून गेला आहे. त्यामुळे आता तळकट पासून पुढील सर्व गावांचा तळकट बांदा अन सावंतवाडीशी संपर्क पूर्णतः तुटला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तळकट ते कोलझर या मार्गावर नवीन पुल होत आहे. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे व बांधकाम खात्याच्या उदासिनेमुळे पावसाळा सुरू होऊनही काम अर्धवट राहिले. आणि पुल बांधकाम सुरू असल्याने उभारलेला पर्यायी मार्ग पावसाच्या पाण्याचा नदीपात्रात वाढलेल्या प्रवाहाने तो मार्ग वाहून गेला. त्यामुळे कोलझर कुंब्रल, कुडासे, पणतूर्ली, भरपाल या गावांसह तळकट हून दोडामार्गकडे येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांचे खुप हाल होणार आहेत.