बंदूक परवान्याचाही प्रश्न मार्गी लावणार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 12, 2024 14:12 PM
views 69  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती संरक्षणाचे सुमारे साडेचार हजार बंदूक परवाने आहेत. मोठ्या संख्येने हे परवाने असून कुटुंबप्रमुखाच्या नावावरील ही बंदूक हस्तांतरित करण्यासाठी काही अडचणी आहेत. पिढीजात असलेल्या या बंदुका पोलीस अहवालानुसार  याबाबतची कार्यवाही करून हस्तांतरित करता येतील. या जिल्ह्यात जवळपास १५० प्रकरणे हस्तांतरणासाठी प्रलंबित आहेत. अशा प्रकरणात त्या कुटुंबातील एका प्रमुख व्यक्तीने नव्याने अर्ज केला तर त्या व्यक्तीला शेती संरक्षणार्थ परवाने प्रथम मंजूर करण्यात येते व त्यांच्या नावे ते शस्त्र हस्तांतरित केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.