विम्याची रक्कम आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा !

नितेश राणे - अरिफ बगदादी यांचे मानले आभार
Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 29, 2023 16:40 PM
views 410  views

देवगड : देवगड तालुका हा प्रामुख्याने आंबा पिकावर अवलंबुन असणारा तालुका आहे. गेली अनेक वर्षे येथील आंबा बागायतदारांना विम्याचा हप्ता भरून देखील विम्याची रक्कम मंजूर होत नव्हती. वारंवार उडवाउडवीची उत्तरे कृषी विभागाकडून दिली जात होती. यामुळे सर्व आंबा शेतकरी संबंधित विमा कंपन्या आणि कृषी विभाग यावर नाराज होते.

               सर्व आंबा शेतकऱ्यांची हि व्यथा समजून घेऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरिफभाई बगदादी यांनी तात्काळ आमदार नितेश राणे यांना संपर्क केला. नितेश राणे यांनी देखील संबंधित विषयाची दखल घेतली.आणि अरिफभाई बगदादी यांच्या समवेत जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याशी फोन कॉन्फरन्स द्वारे चर्चा करून आंबा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याच्या दृष्टीने सूचना आमदार राणे  यांनी केल्या. आमदार राणे साहेबांच्या सूचनेनुसार  मा. कृषी अधीक्षक यांनी यावर त्वरित कार्यवाही करू अशी हमी आमदार राणे साहेब आणि श्री. बगदादी यांना दिली. यानुसार कृषी विभागाकडून आंबा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.

           अनेक वर्षे प्रलंबित असणारी आंबा पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होत असल्याने सर्व आंबा शेतकरी अत्यंत समाधानी असून, आमदार नितेश राणे आणि या संबंधी पाठपुरावठा करणारे अरिफ बगदादी यांचे आभार व्यक्त करत आहेत.