जनता आणि पोलीस यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील : पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

Edited by:
Published on: November 01, 2023 20:06 PM
views 52  views

वैभववाडी : पोलीस पाटील हा गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच महत्वाचे करीत असतात.तसेच जनता आणि पोलीस यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील महत्त्वाची भुमिका बजावतात असे मत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.

येथील पोलीस स्थानकाच्या वार्षीक तपासणीकरीता श्री.अग्रवाल आले होते.यावेळी त्यांनी पोलीस पाटीलांची बैठक घेतली.त्यानंतर जेष्ठ नागिरकांशी देखील संवाद साधुन त्यांना येणाऱ्या अडअडचणी जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे उपस्थित होते.

श्री.अग्रवाल म्हणाले गावातील लहान मोठ्या आणि इत्यंभुत माहीती ही पोलीस पाटीलांना माहीती असते.गावातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखावी याची जाण देखील  त्यांना असते.जनतेचे प्रश्न देखील त्यांना माहीती असतात.जनता आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणुन त्यांना काम करायचे असते.हे काम करीत असताना आपण गावात अनोळखी व्यक्ती,संशयास्पद हालचाली याची माहीती पोलीसांपर्यत पोहोचविणे आवश्यक असते.गावात आपले नेटवर्क देखील चांगले असणे आवश्यक आहे.पोलीस प्रशासनाला त्याचा उपयोग होईल.यावेळी पोलीस पाटीलांना जाणवणाऱ्या समस्या देखील त्यांनी जाणुन घेतल्या.

त्यानंतर तालुक्यातील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला.जेष्ठ नागरिकांना कोणत्या समस्या येतात यासंदर्भात त्यांनी विचारपुस केली.जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांताराम रावराणे,दत्ताराम साटम,प्रकाश जैतापकर,आदी उपस्थित होते.

फोटो ओळी- येथील पोलीस स्थानकात पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पोलीस पाटीलांशी संवाद साधला.