मृत बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाखांचा निधी अदा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक शिशिर परुळेकर, मेघा सावंत यांचा विशेष पाठपुरावा
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 18, 2023 11:35 AM
views 328  views

कणकवली : आज हायवे ठेकेदार कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे प्राण गमवलेल्या कै बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबातील सदस्य यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात मोलाचा वाटा शिशिर परुळेकर, महेश सावंत आणि कार्यकर्त्यांनी विविध आंदोलन,  सोशल मिडीयात आवाज उठवून कित्येक महीने सुरू ठेवला त्याला आज यश आले . या प्रकरणात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी मोलाची बाजू मांडत तडजोड करीत कंपनीकडून 250000 ची मदत  देण्यात आली. 

या प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे,  उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेधा सावंत, महेश सावंत, यांनी ही रक्कम सुहासिनी तावडे यांना सुपूर्त करण्यात आली. या प्रसंगी कुटुंबीयांनी सर्वाचे आभार मानले. शिशिर परुळेकर यांचे कुटुंबीयांनी विशेष आभार मानत, नगराध्यक्ष आणि टीम ला धन्यवाद देत आशीर्वाद दिले.