
कणकवली : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आशिये गावाच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार आशिये सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक राजकीय वाटचालीसाठी अन् कोकणच्या विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, सचिन गुरव, सुहास गुरव, अविराज मराठे, अमोल गुरव, आदींसह आशिये गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.