शासन आपल्या दारी अंतर्गत योजनांची माहिती प्रत्येक लभार्त्यांपर्यंत पोचवणार...!

Edited by: दिपेश परब
Published on: June 15, 2023 20:02 PM
views 174  views

वेंगुर्ला :  शिंदे- फडणवीस सरकारचा शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक नागरिकां पर्यंत पोचवा यासाठी शासनाच्या वतीने काढण्यात आलेली शासनाच्या विविध योजनांची पुस्तिका प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचावी व या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्याबाबत आज (१५ जून) वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या मासिक सभेत निर्णय घेण्यात आला. तर शासन आपल्या दारी ही पुस्तिका वाटपाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा आज (१५ जून) सप्तसागर अपार्टमेंट येथील तालुका कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम, मच्छिमार सेल तालुकाप्रमुख गणपत केळुसकर, पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर, पं स माजी सदस्य समाधान बांदवलकर, शाखाप्रमुख शिवाजी पडवळ, विभाग संघटिका सावली आडारकर, दाभोली उपसरपंच फिनसुअनिता फर्नांडिस,  ग्रा प सदस्य एकनाथ राऊळ, शिरोडा माजी ग्रा प सदस्य कौशिक परब, कृतिका कुर्ले, श्यामसुंदर कोळंबकर, दयानंद सावंत, सुधीर धुरी, संजय पाटलेकर, तुळस विभाग प्रमुख संजय परब आदी उपस्थित होते. 

यावेळी १९ जून रोजी मुंबई- गोरेगाव येथे होणाऱ्या शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जाण्याचे ठरवण्यात आले. नियमित कर्जदार यांना मिळणाऱ्या ५० हजार प्रोत्साहन पर अनुदानापासून अद्यापपर्यंत वंचित असलेल्या शेतकऱ्यांना ते प्रयत्न करणे तसेच खावटी कर्जाचा लाभ सर्वांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत ठरवण्यात आले. पर्यटना संदर्भात महत्वाचे असलेले मोचेमाड येथील हॉटेल जुलै महिन्यात सुरू होत आहे. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. आरवली, उभादांडा, आसोली, पालकरवाडी, मठ व वेंगुर्ले शहर याठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोफत पाणीवाटप केल्याबद्दल केसरकर यांचे आभार व्याक करण्यात आले. तसेच १० वी व १२ यशस्वी विद्यार्थी सत्कार संदर्भात मोठा कार्यक्रम अयोजित करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.