मेडिकल कॉलेजच्या कारभाराची वैभव नाईकांनी काढली लक्तरे

Edited by:
Published on: December 12, 2023 11:33 AM
views 3724  views

नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल करत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराची लक्तरेच काढली आहेत. प्रश्नोत्तराच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या कारभाराबाबत प्रश्न विचारत या महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराची जणू पोलखोलच केली आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या काळात आमदार वैभव नाईक नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत बोलले होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतलं होत. हे यावर्षीचे तिसरे वर्ष वैद्यकीय महाविद्यालयाचे सुरू आहे. गेल्या दोन - तीन वर्षांमध्ये या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज 500 ओपीडी सुरू होती. मंत्री महोदयांना सुद्धा मी यासंदर्भात भेटलो होतो. येथे मेडिकल कॉलेजमध्ये असलेले डीन आणि अकाउंट ऑफिसर असलेले नवले हे अतिशय मनमानी कारभार करत आहेत.

मेडिकल कॉलेजमध्ये औषध लेखा अधिक्षक साठा उपलब्ध केला नाही. औषधांचा या ठिकाणी वाणवा जाणवत आहे. वर्षभरापूर्वी 25 डॉक्टर कॉन्ट्रॅक्टरवर होते आणि आज मात्र फक्त तीन डॉक्टर हे कंत्राटीबेसेसवर वर आहेत. त्यांचे पगारही तीन तीन महिने मिळत नाही आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा मिळत नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना बाहेर जावे लागते.

लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडवावा. तसेच कॉलेजमध्ये ज्या काही अडचणी आहेत. त्या सोडवल्या पाहिजेत. रक्तपेढी बंद, एक्स-रे मशीन बंद, सिटीस्कॅन मशीन बंद आहे. ज्या सुविधा रुग्णालयामध्ये पाहिजे त्या सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध होत नाही आहेत. असा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या गैरकारभाराची लक्तरेच आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या काळादरम्यान काढत या मेडिकल कॉलेजच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.