कोकणातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा यांना मिळालाय जिल्हास्तरीय विजेता बहुमान
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 19, 2022 17:24 PM
views 473  views

मुंबई : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२ या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा यांनी सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ २०२२ जिल्हास्तरीय विजेता हा बहुमान प्राप्त केला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कोकणातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सनातन करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग सचिव सौरभ विजय, मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रतिक बांदेकर, प्रसाद नार्वेकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.