सावंतवाडी तालुक्यात शिवजयंतीचा उत्साह | विविध कार्यक्रमांचे आयोजन

ग्रामीण भागातही शिवजयंतीचा जल्लोष
Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2023 17:46 PM
views 209  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरसह तालुक्यात ग्रामीण भागात सर्वत्र गावागावात ग्रामपंचायत शाळेमध्ये संस्था संघटना आधी विविध ठिकाणी आज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव जल्लोषात साजरी करण्यात आली.  सावंतवाडी शहरात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  सावंतवाडी खासकील वाडा, गावडे शेत येथील शिवधर्म प्रतिष्ठान व शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ तर्फे शिवजयंती उत्सव निमित्त विद्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळ्यास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पहार अर्पण केला.  यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक आनंद नेवगी, अजय सावंत, बंटी पुरोहित, महेश पांचाळ, गुरु गावडे, अथर्व पांचाळ, अक्षय रेडकर, निखिल गावडे, लक्ष्मीकांत पांचाळ, रमाकांत पांचाळ, अमय रेडकर, आर्यन पांचाळ, संदेश रेडकर आधी उपस्थित होते. 


सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळतर्फे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजू परब, खजिनदार भूपेंद्र सावंत, महिला तालुकाध्यक्ष संजना परब, विनोद सावंत सौ सावंत समीर पालव उपस्थित होते.


माडखोल, कलंबिस्त, शिरशिंगे, गोटेवाडी, सांगेली आधी ठिकठिकाणी शिवजयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. कलंबिस्त गण शेळवाडी येथे रॉयल बुलेट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली. कलंबिस्त मळा येथेही शिवजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम करण्यात आले.