
सिंधुदूर्ग : महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुका शाखेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून, आतापर्यंत या क्षेत्रात असणारी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत कुडाळ तालुका ग्रामसेवक संघटनेने तालुका शाखेवर समती अध्यक्ष ते सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य महिलाच त्या ही बिनविरोध निवडून कुडाळ मधील ग्रामसेवक बंधूंनी जिल्ह्यासमोर एक वेगळा आदर्श घालून दिलाय. जिल्ह्यातील सर्वात प्रथम बिनविरोध झालेली महिला राज समिती ही कुडाळ मधून असून या निवडीचे आणि सर्व महिला ग्रामसेवकांना प्रतिनिधित्व दिल्याचे जोरदार स्वागत होत आहे.
जिल्ह्यात असलेल्या सुमारे ४३१ ग्रामपंचायत निहाय ग्रामसेवकांची आठही तालुक्यात स्वतंत्र शाखा आहे. आणि आजवर या शाखांवर अध्यक्ष हे हमखास पुरुष वर्गाकडे असायला पाहिजे असा अलिखित नियम असायचा. मात्र हाच नियम बाजूला सारत आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत असल्याने कुडाळ मधील ग्रामसेवक बंधूंनी आपल्या समवेत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या सहकारी महिलांचा आगळा वेगळा सन्मान केला आहे. तालुक्याची अख्खी कार्यकारिणी महीलांचीच आणि ती ही बिनविरोध निवडून सावित्रीच्या लेकिंना आगळ वेगळं गिफ्ट दिलं आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारिणी खालीलप्लरमाणे
श्रीम.सोनिया संतोष पालव / पांजरी - अध्यक्ष
श्रीम. सपना गणपत मसगे - उपाध्यक्षा
श्रीम.शालिनी बाबु कोकरे - महिला उपाध्यक्ष
श्रीम.सुषमा दत्ताराम कोनकर - सचिव
श्रीम.अन्वी हेमंत शिरोडकर -कोषाध्यक्ष
श्रीम रश्मी विक्रमसिह रोहीले / राउळ - सहसचिव
श्रीम.सानिका सागर पालव / घुगरे - प्रसिध्दीप्रमुख
श्रीम.सरीता शंकर धामापुरकर- कायदे विषयक सल्लागार
श्रीम.श्रध्दा प्रकाश आडेलकर - महिला संघटक
निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भास्कर शंकर केरवडेकर (निवृत्त विस्तार अधिकारी) व निवडणूक निरीक्षक म्हणून संतोष गावडे जिल्हा अध्यक्ष हे उपस्थीत होते.