शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात दीपक केसरकर यांच्या विजयाचा एल्गार

Edited by: दिपेश परब
Published on: September 30, 2024 14:28 PM
views 61  views

वेंगुर्ला : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी दीपक केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असणार आहेत. यामुळे आता बेसिक, महिला, युवासेना यांनी एकत्रित येऊन प्रचार यंत्रणा अधिक जलद गतीने राबवावी. प्रत्येक गावात दीपक केसरकर यांनी विकास कामांसाठी करोडो रुपये निधी दिला आहे. कोण काय बोलतंय त्या बांडगुळांकडे दुर्लक्ष करून प्रत्येक गावात आपली असलेली ताकद दाखवा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी वेंगुर्ले येथे केले.  

येथील स्वामिनी मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात अशोक दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे आबा केसरकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन देसाई, शहरप्रमुख उमेश येरम, तालुका संघटक बाळा दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, कांबळेवीर देवस्थानचे अध्यक्ष दाजी पाटकर, जेष्ठ पदाधिकारी उत्तम वैद्य, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, महिला शहर संघटिका ऍड श्रद्धा परब- बाविस्कर, मनाली परब, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. आज दीपक केसरकर यांनी जे केलं नाही ते काहीजण काढतात मात्र जे त्यांनी केलं आहे ते कितीतरी पटीने मोठं आहे आणि हे जनतेला माहीत आहे. आणि ज्यांना त्यांच्या गावातून बाहेर काढलं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय बोलणार अशी टीका राजन पोकळे यांनी करत. आता फक्त दीपक केसरकर यांना विजयी करण्याचे ध्येय समोर ठेऊन काम करा असे आवाहन केले.  मंत्रिमंडळात एक जेष्ठ मंत्री म्ह्णून दीपक केसरकर यांच्याबद्दल प्रत्येक नेत्याला आदर आहे. त्यांचे जे काम असेल तर त्याला प्राधान्य दिलं जात आणि हे जवळून पाहण्याचा योग विविध कामांचा पाठपुरावा करत असताना मला आला आहे. आपण काम करतो आहे ते फक्त आणि फक्त दीपक केसरकर यांच्यासाठी.  या मतदार संघात सात्यताने लोकांसाठी शेतकरी, महिला यांच्यासाठी काम करणारे केसरकर असल्याने आमदार होण्याचा अधिकार त्यांनाच आहे. यासाठी आपला हक्काचा माणूस म्ह्णून केसरकर यांना आमदार करण्यासाठी एकजुटीने कामाला लागूया. असे सचिन वालावलकर यांनी सांगितले.

सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी , हितासाठी आज केसरकर गेली ३५ वर्षे काम करत आहे.  आज जे त्यांच्यावर टीका करतात त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील ५ पैशांचा तरी निधी आणला काय? कोट्यवधीचा निधी केसरकर यांनी वेंगुर्ला तालुका, शहरासाठी दिला. आता वेळ आहे केसरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची. यामुळे प्रत्येक पदाधिकारी यांनी आता कामाला लागावे. येणाऱ्या विधानसभेत केसरकर यांचा विजय नक्की आहे. असे यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

महिला संघटनेत पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान

या कार्यक्रमात महिला उपजिल्हा संघटिका शीतल साळगावकर, रेडी जि प महिला विभाग संघटिका हर्षा परब, शिरोडा महिला शाखा संघटिका पूजा राऊत, बूथ संघटिका पदी पूर्वी बांदेकर, शिल्पा फटजी,  जयमाला कवठणकर, उमा मठकर, ममता मठकर याना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.