
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला जात आहे. यातूनच पोलिस प्रशासनाच्या मदतीने अशा प्रकारच्या वाहनावर आणि मालकांवर गुन्हे नोंद केले जातात. अशाच एका प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोपींना गोशाळेला खावटी खर्च देण्याचा निकाल न्यायालयाच्यावतीने देण्यात आला आहे.
गोवंश वाहतुकीच्या प्रकरणात आकेरी तालुका कुडाळ येथील आरोपी मनोज मंगेश सावंत याला रोख 36 हजार रुपये आणि २ लाख रूपये क्षतिबंध आणि इतर अटी शर्ती याच्या अधीन राहून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निकालाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरक्षकांच्या प्रयत्नाला यश आले आहे. न्यायालयाच्या या निकालाने भविष्यात कोणी असा प्रयत्न करणार नाही अशी आशा बाळगण्यात येत आहे. ध्यान फाउंडेशन चे वकील अँड राजू गुप्ता, मानद पशु कल्याण अधिकारी सचिन झुंजारराव यांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद मांडले होते.