
दोडामार्ग : सरगवे झरे पुनर्वसन २ मध्ये शंकर जयसिंग देसाई यांच्या निवस्थानी विराजमान झालेल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या खाशांच्या राजाचे बुधवारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी उपस्थित शंकर देसाई, राजाराम देसाई, भगवान गवस, गुरू सावंत, ज्ञानेश्वर शेटवे, योगेश महाले, रामदास मेस्त्री आदी उपस्थित होते.
सरगवे येथील देसाई कुटुंबीयांचा दरवर्षी ११ दिवसांचा गणपती असतो. देसाई कुटुंबीय गेली कित्येक वर्षे अनंत चतुर्दशीला श्री देव अनंत पूजन करतात. यावेळी दशक्रोशितील नागरिक याठिकाणी मोठी गर्दी करत श्री चरणी नतमस्तक होतात. भजन कीर्तन करतात. सत्यनारायण महपुजा व नवस बोलणी असे कार्यक्रम होतात. त्यामुळे देसाई कुटुंबीय यांच्या बाप्पा उत्सवाला विशेष महत्व असते. या वर्षी शालेय शिक्षण मंत्री यांनी देसाई यांच्या बाप्पाचे दर्शन घेतल्याने त्यांचा आनंद अधिक द्विगुणित झाला आहे.