बसचे पंक्चर काढताना अचानक जॅक तुटल्याने चालक गंभीर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 01, 2023 12:17 PM
views 327  views

देवगड : देवगड आगाराची कणकवली मिठबाव तांबळडेग MH १४ BT २७६७ ही गाडी शनिवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजता तांबळडेग येथून कणकवली येथे जात होती. सकाळी पावणे सात वाजता ही गाडी मिठबाव बाजारपेठेत आलेली असताना तेथे पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्याने गाडी एका बाजूला उभी करून चालक प्रकाश (दादू) वसंत पवार (रा शिरगाव चाफेड)हे पंक्चर काढत असताना अचानक जॅक निसटल्याने पंक्चर काढणाऱ्या ड्रायव्हरच्या अंगावर ही गाडी आपटली. यामुळे ड्रायव्हरच्या मणक्याला मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे.

त्याला तातडीने देवगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज मिठबावचा आठवडा बाजार असल्याने तसेच रेल्वेसाठी जाणारे मुंबईचे प्रवासी आत असल्याने गाडी पूर्ण भरलेली होती. पंक्चर काढत असताना गाडीतील प्रवासी उतरलेले नव्हते. गाडीचा जॅक लावत असतानाच तो तुटला किंवा सुटला असावा यामध्ये गाडीचा चालक जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी तातडीने देवगड येथे हलविण्यात आले आहे. या  गाडी मध्ये असलेले सर्व प्रवासी मिळेल त्या गाडीने मार्गस्थ झाले.