ग्रामस्थांच्या एकजुटीतूनच बावशी गावचा विकास शक्य

नूतन उपसरपंच दिनेश कांडर सत्कार प्रसंगी समीर मयेकर यांचे प्रतिपादन
Edited by: संदीप देसाई
Published on: November 22, 2023 14:53 PM
views 200  views

कणकवली :  ग्रामस्थांच्या एकजुटीतूनच बावशी गावचा विकास शक्य असून गावचे नूतन उपसरपंच दिनेश कांडर यांना गाव विकासाठी गावातील सर्वांचे सहकार्य मिळेल असे प्रतिपादन गावचे पोलीस पाटील तथा बावशी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रतिष्ठानचे मुख्य कार्यवाह समीर मयेकर यांनी बावशी येथे केले.

   तोंडवली - बावशी ग्रुप ग्रा. पं.चे नूतन उपसरपंच दिनेश कांडर यांचा सत्कार समारंभ समीर मयेकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. बावशी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर, विद्यमान अध्यक्ष विलास कांडर, सहकार्यवाह संजय राणे, कोष्याध्यक्ष शिवराम गुरव, महिला विभाग प्रमुख कल्पना कांडर, कार्यकारणी सदस्य नारायण मर्ये, मनीषा राणे, वनिता कांडर, सदानंद कांडर आदी उपस्थित होते.

   शिवराम गुरव म्हणाले, गावच्या विकासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे.जेव्हा आपल्याला वाटत गाव विकास व्हायला हवा तेव्हाच गावचा विकास होत असतो. कल्पना कांडर म्हणाल्या, दिनेश कांडर यांच्या या पदामुळे बावशी गावठणला खूप वर्षीनी उपसरपंचपद मिळाले आहे.त्यामुळे बावशी गावठणच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा बाळगुया. यावेळी दिनेश कांडर यांनीही मनोगत व्यक्त केले.संजय राणे यांनी आभार मानले!