करुळ घाटात संरक्षण भिंतीच काम निकृष्ट दर्जाचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा आरोप
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 21, 2024 10:35 AM
views 159  views

वैभववाडी : करुळ घाटात संरक्षण भिंतीचे सुरू असलेलं काम योग्य पद्धतीने केलं जातं नाही.संरक्षण भिंत बांधतांना ठेकेदाराकडून सिमेंटचा वापर केला जात नाही.केवळ खडीच्या भुशावर हे काम केले जात आहे.संबधित विभागाने हे काम त्वरित थांबवावे.संबधित विभागाने हे काम दर्जेदार करून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

  तळेरे-गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या आक्टोबरपासून सुरू आहे.हे काम दर्जेदार नसल्याने त्याबाबत अनेक तक्रारीही झाल्या होत्या.तसेच जुलै महिन्यात करुळ घाटात नव्याने बांधलेली संरक्षण भिंत कोसळली होती.त्या घटनेत कॉक्रीटीकरणाचा रस्ताही वाहून गेला होता.आता पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर घाटात दरडीकडील संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे.मात्र हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.संबधित ठेकेदाराकडून हे काम करीत असताना त्यांनी सिमेंटचा वापर केला नाही.केवळ खडीचा भुसा वापरून ही भिंत उभारण्यात येत आहे.पावसात हे काम टिकू शकत नाही.त्यामुळे संबंधित विभागाने हे काम तात्काळ थांबवावे.तसेच दर्जेदार काम ठेकेदाराकडून करून घ्यावं अशी मागणी श्री चव्हाण यांनी केली आहे.