शिरोडा वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा मृत्यू

Edited by: दिपेश परब
Published on: November 03, 2024 14:27 PM
views 409  views

वेंगुर्ले :  शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव येथील पर्यटक याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा  समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक शिंदे ( वय ४४, रा.बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आले होते. हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील बीज वर पोहोचले. तेथील समुद्राच्या लाटा पाहून हे पाण्यात आंघोळी साठी उतरले. मात्र यातील विनायक शिंदे यांचा किनाऱ्या पासून काही अंतरावरच पाण्यात बुडून मृत्यू झाला. या बाबत शिरोडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.