सावंतवाडी : एसटी आगाराच्या वेंगुर्ला बस स्थानकात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली असून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा सुरू असून ही महिला कुडाळ तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.