
दोडामार्ग : मणेरी येथे तिलारीनदी पात्राच्या लागत सासोली हेदुस येथील लक्ष्मीकांत बाबुराव करमळकर यांचे माडपोफळीचे बागेत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह गुरवारी आढळून आला आहे.
शवविचछेदन केल्यानंतर या इसमाचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सासोली हे हेदुस येथे लक्ष्मीकांत बाबुराव करमळकर यांचे माड पोपळीचे बागेत दक्षिणेस 6 किमी अंतरावर हा मृतदेह आढळून आला असून पंचनामा व शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी आकस्मक मृत्यू अशी नोंद केली आहे. संजय पांडुरंग गवस, वय सासोली गावठाणवाडी यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.