
पणजी : 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यासाठी गोवा सरकारने सहमती दर्शविली होती. त्यानुसार गोव्यात या वर्षी २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या संबंधीचं पत्र अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी संबधितांना दिले आहे.
या स्पर्धा मोठ्या जल्लोषात आणि नियोजनबद्धरित्या होण्यासाठी गोवा सरकार प्रयत्न करत आहे.