न्यायालयाचा प्रश्न मार्गी लावणार ; पालकमंत्र्यांचे आश्वासन

वकील संघटनेकडुन जनता दरबारात वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: August 14, 2024 10:01 AM
views 573  views

सावंतवाडी : वाढलेली वकील संख्या व न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता न्यायालयीन इमारतीच्या जागेसाठी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅङ परिमल नाईक व सावंतवाडी तालुका संघटनेच्या अध्यक्ष निता कवीटकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथिल जनता दरबारात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्याबाबत मागणी केली. यावेळी पालकमंत्री यांनी वकील संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला‌. मंत्रालय स्तरावर तंत्रनिकेतन विभाग, महसुल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत आवश्यक त्या परवानग्या व कार्यवाही जलद गतीने होण्याचे आश्वासन दिले व त्या धर्तीवर आदेशही पारीत केलेत.

सावंतवाडी येथिल सध्यस्थितीमध्ये अस्तीत्वात असलेली न्यायानलयीन इमारत ही संस्थानकालीन न्यायानयाची इमारत आहे. वाढलेली वकील संख्या व न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता ही इमारत फारच अपुरी ठरत आहे. परिणामी त्याचे पडसाद न्यायालयीन कामकाजावर व पर्यायाने वकीलांच्या कामकाजावर पडत असल्याने बऱ्याच समस्यांना त्याची झळ पोहचते. याकरीता सातत्याने वकील संघटनेकडुन नविन इमारतीच्या बांधकामसाठी सोयीस्कर जागा मिळावी याकरीता वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती. जिल्हा न्यायालय प्रशासन विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने सुद्धा  वेळोवेळी पाठपुरावा शासन दरबारी करण्यात आलेला होता. शासकीय गोदाम नजीक अतिरीक्त सत्र न्यायालयाची जमीन आजही न्यायालयाच्या कब्जात आहे.

त्याठीकाणी न्यायालयीन इमारत व्हावी याविषयी वकील वर्ग आग्रही होते. परंतु उच्च न्यायानयाच्या नियमावली नुसार सर्व सुविधांसहीत न्यायालयीन इमारत व न्यायाधिश निवासी इमारत बांधण्यासाठी ही जागा अपुरी असल्याचे प्रधान वास्तु विशारद मुंबई यांनी आपला अभिप्राय दिलेला असल्याने दुसरी पर्यायी जागा सोईस्कररित्या उपलब्ध होणे आवश्यक होते. पुर्वी सावंतवाडी पोलिस स्टेशन नजीक अस्तीत्वात असलेली आय. टी. आय. (शासकीय तंत्रनिकेतन) यांच्या अखत्यारीतील जागा ही रिक्त असुन आय. टी. आय. प्रशासन हे कोलगांव येथे हलविण्यात आलेले आहे. ती जागा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुबलक असुन पोलिस स्टेशन, कारागृह, तहसिलदार कार्यालय यांच्या नजदिक सोईस्कररीतत्या उपलब्ध होणारी आहे.

याकरीता जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅङ परिमल नाईक व सावंतवाडी तालुका संघटनेच्या अध्यक्ष निता कवीटकर यांच्या नेतृत्वाखाली आज सिंधुदुर्गनगरी येथिल जनता दरबारात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन न्यायालयीन इमारतीच्या जागेसाठी मागणी केली पालकमंत्री यांनी वकील संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्रालय स्तरावर तंत्रनिकेतन विभाग, महसुल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत आवश्यक त्या परवानग्या व कार्यवाही जलद गतीने होण्याचे आश्वासन दिले. त्या धर्तीवर आदेशही पारीत केलेत. सावंतवाडी वकील वर्गाकडुन मंत्री यासाठी पालकमंत्री यांचे आभार मानण्यात आले व समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष सौ. निता कवीटकर, अॅङ शामराव सावंत, अॅङ संदीप निंबाळकर, अॅङ डि. के. गावकर, अॅङ निलीमा गावडे, अॅङ राजेश पराडकर, अॅङ स्वप्नील कोलगावकर, अॅङ संकेत नेवगी, अॅङ रश्मी नाईक, अॅङ अमिषा बांदेकर, अॅङ दत्तप्रसाद ठाकुर, अॅङ कौस्तुभ गावडे इ. वकील वर्ग उपस्थित होते.