पोलिस ठाण्यासह थकीत पाणीपट्टी असलेल्या 20 जणांचे कनेक्शन बंद

कुडाळ मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दिली माहिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 04, 2023 18:34 PM
views 233  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने थकीत पाणीपट्टी धारकांवर कारवाई करायला सुरुवात केली असून आतापर्यंतकुडाळ पोलिस ठाण्यासह २० जणांचे नळ कनेक्शन बंद केले. यापुढे अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या पाणीपट्टी विभागाकडून ३६ लाख अधिकची पाणीपट्टी थकविणाऱ्या २३६ नळपाणी धारकांना पाणीपट्टी बंद करण्यासाठीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. पाणीपट्टी न भरल्यास पाणीपट्टी बंद करणार असल्याचे नोटिसा संबंधित थकबाकीदारांना देण्यात आलेल्या असताना काही थकबाकीदारांनी नोटीसी प्रमाणे पाणीपट्टी भरली, मात्र अनेक जणांनी ही थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यासाठी नगरपंचायतीने पथक तयार केले. त्यानुसार कुडाळ शहरातील कुडाळ पोलीस ठाणेसह 20 जणांची, वर्षींनूवर्ष थकीत पाणीपट्टी असल्याने या २० जणांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

ही कारवाई कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, पथक प्रमुख तथा विभाग प्रमुख विजय आजगावकर, लिपिक सचिन म्हाडदळकर, वसुली कर्मचारी वामन राणे, यशवंत कुडाळकर, चंद्रशेखर आळवे, पुंडलिक होडावडेकर, चंद्रकांत कुंभार, साईप्रसाद खोत यांच्या पथकाने केली ही कारवाई अशी सुरू राहणार असून पाणीपट्टी थकीत असल्याने नळ धारकांकडे जाऊन ती पाणीपट्टी भरून घेण्यासाठी वसूल पथक तयार करण्यात आले आहे.