
कुडाळ : कुडाळ बस आगारात गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेले घड्याळ अखेर सुरू झाले आहे. कोकणसाद LIVE ने यासंदर्भात बातमी प्रकाशित केल्यानंतर एसटी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली, त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेले अनेक दिवस कुडाळ बस आगारातील घड्याळ बंद अवस्थेत होते. त्यामुळे प्रवाशांना नेमकी वेळ समजत नव्हती आणि बऱ्याचदा त्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन कोकणसादने 'बंद घड्याळ' या शीर्षकाखाली एक वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत एसटी अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही केली आणि हे बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून पुन्हा सुरू केले.
आता आगारातील घड्याळ व्यवस्थित चालू झाल्याने प्रवाशांना बसची वेळ पाहणे सोपे झाले आहे. याबद्दल प्रवाशांनी कोकणसादचे आणि एसटी प्रशासनाचे आभार मानले आहेत.