तोरसोळे शाळेच्या मुलांचं केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धत भरघोष यश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 17, 2023 16:37 PM
views 151  views

देवगड : देवगड  येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तोरसोळे येथे करण्यात आले होते. त्यामध्ये तोरसोळे शाळा नं.१ या प्राथमिक शाळेच्या विद्ार्थ्यांनी चांगले यश मिळवले.विजेत्या या सर्व मुलांना मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे समुहगान लहान गट प्रथम,समुहगान मोठा गट प्रथम, समुहनृत्य लहान गट प्रथम, समुहनृत्य मोठा गट प्रथम, कबड्डी मोठा गट मुलगे प्रथम,

कबड्डी मोठा गट मुली प्रथम, कबड्डी लहान गट मुली प्रथम, रिले ५०x४ लहान गट मुली प्रथम, रिले १००x४ मोठा गट मुलगे प्रथम, रिले १००x४ मोठा गट मुली प्रथम, लांब उडी मुलगे  लहान गट प्रथम, लांब उडी लहान गट मुली प्रथम, लांब उडी मोठा गट मुलगे प्रथम, लांब उडी मोठा गट मुली प्रथम, गोळा फेक मोठा गट मुलगे प्रथम, गोळा फेक मोठा गट मुली प्रथम, या सर्वांना संतोष शिंगाडे कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे माध्यमातून सर्व यशस्वी मुलांना गोल्ड,सिल्व्हर व प्रमाणपत्र देण्यात आले.

या वेळी सर्व मुलांच्या नाश्ताची व जेवणाची सोय करण्यासाठी गावातील सर्व महिला भगिनीॅनी कडून करण्यात आली होती.

या वेळी सरपंच श्रीम.तेजस्विनी पवार,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संजिवनी ठुकरुल,उपाध्यक्ष श्रीम.शुभ्रा मेस्त्री,श्री. देवदत्त कदम,श्रीम.रिया पवार,प्रांजल पवार,श्रीम.सुप्रिया पवार ,केंद्राचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक श्री.सत्यवान चव्हाण सर,क्रीडाप्रमुख श्री.सुनिल कोदले ,श्रीम.मुसांडे मॅडम,श्री. किरण पवार सर ,श्री.राजन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.