सिंधुदुर्गातील टॅक्सी चालकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांचं वेधलं लक्ष..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 12:20 PM
views 232  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी ड्रायव्हरना गोव्यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे दिलासा देण्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच माजी आमदार राजन तेली यांनी लक्ष वेधलं. कुणकेरी येथील भाजपचे कार्यकर्ते भगवान सावंत यांनी राजन तेलींच पत्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देत गोवा सरकारकडून दिलासा मिळावा अशी विनंती केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरूण नोकरी-धंद्यानिमित्त जवळच्या गोवा राज्यावर अवलंबून आहेत. खासकरून अनेक वाहनचालक गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, त्यांचे वाहन परवाने MH 07 (सिंधुदुर्ग जिल्हा) असल्याने गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनचालकांना नाहक भुर्दंड बसत असल्यामुळे त्यांना योग्य तो दिलासा मिळावा अशी विनंती यावेळी त्यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना केली.