भारतीय किसान संघाच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 20, 2025 19:25 PM
views 21  views

सिंधुदुर्गनगरी : 'शेतकऱ्यांना सिबिल मागणाऱ्या बँकावर कार्यवाही करा' मुख्यमंत्री यांचे सर्व बँकाना राज्यस्तरीय बँकर्स समिती च्या बैठकीत निर्देश दिले. सिबिल मुळे शेतकऱ्याचे नुकसान नाही झाले पाहिजे, चांगले पिक घेण्यासाठी त्याला आर्थिक सहाय्य उभे राहिले पाहिजे, बँकेने ते उभे करून दिले पाहिजे.

या अडचणीचा अभ्यास करून ही अडचण भारतीय किसान संघ आणि भारतीय ऍग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटर मार्फत केंद्र आणि राज्य शासन तसेच भारतीय रिसर्व्ह बँक यांच्या निदर्शनास आणून दिली गेली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला सिबिलची अट न देता कर्ज देण्यास सांगितले. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे भारतीय किसान संघातर्फे आभार मानण्यात आले आहेत.