
कणकवली : रत्नागिरी हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार महामार्ग लगतच्या पीकअप शेडमध्ये घुसली.या अपघातात शाळेत जण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या शाळकरी मुलीसह कारचा चालक जखमी झाला आहे. पिकअप शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी साडे नऊ वाजता घडला.
घटनास्थळी कणकवली पोलिसांनी धाव घेतली आहे पण ग्रामस्थांनी ही पिकप शेड महामार्ग लगत असल्याने त्या पिकप शेडला थोडं महामार्गापासून लांब उभ करण्याची गरज असल्याचे सांगत महामार्ग अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय आम्ही गाडी उचलू देणार नाही असा पवित्र घेतला होता.