'वंचित'चा दणका ; कणकवली वस्तीगृहातील मुलींना मिळालं जेवण

सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा : महेश परुळेकर
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 22, 2023 15:22 PM
views 201  views

कणकवली : गेले दोन दिवस कणकवली मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींना ठेकेदाराने ठेका बंद केल्यामुळे जेवण मिळत नसल्याने उपाशीपोटी राहावे लागत होते. याविषयीची माहिती पालकांकडून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांना मिळाली . त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह 21 रोजी कणकवलीचे मुलींचे वसतिगृह येथे जाऊन वस्तुस्थिती ची पाहणी केली. वसतिगृह अधीक्षक संतोष जाधव यांची भेट घेऊन जाब विचारला . जवळपास दीड तास झालेल्या आंदोलनानंतर संतोष जाधव यांनी आपण मुलींच्या  जेवणाची व्यवस्था करतो असे  आश्वासन दिले.अखेर दोन दिवसां नंतर काल रात्री मुलीला हॉटेलचे जेवण देण्यात आले. नवीन ठेकेदार नेमण्यात येईपर्यंत यांनी मुलांच्या जेवणाची - नाश्ताची व्यवस्था करण्याचे आश्वासन वसतिगृहाचे अधिक्षक संतोष जाधव यांनी दिले आहे.

        वसतिगृहातील मुला -मुलींना शासनाने दिलेल्या आवश्यक सोई- सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रमोद कासले , युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम प्रज्ञा जाधव ,भारतीय बौद्ध महासभा कणकवली तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, तालुका सेक्रेटरी जनिकुमार कांबळे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

या पुढच्या काळामध्ये जिल्ह्यात जबाबदार असणाऱ्या  सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन  त्याना जाब विचारण्यात येनार आहे.माननीय जिल्हाधिकारी  यांची भेट घेवुन बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी करण्यात येनार असुन संबंधित समस्यांचे निराकरण वंचितच्या माध्यमातून करण्यात येईल याची खात्री विद्यार्थ्यांनी बाळगावी .  वसतिगृह प्रश्नांची तड लावण्यासाठी मुलांनी मुलींनी आपल्याला थेट संपर्क करण्याच आवाहनही परुळेकर यांनी केले आहे .