कुडाळ जिल्हा परिषदेवर 'धनुष्यबाण' जोरात

९ पैकी ५ गटांत शिवसेनेची बाजी ; भाजपाला २ तर ठाकरे सेनेला केवळ १ जागा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 09, 2026 17:57 PM
views 163  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ मतदारसंघांच्या निकालांनी जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारत ५ जागांवर कब्जा मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाला २ जागांवर यश मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नेरूर गटात मात्र अपक्ष उमेदवाराने सर्वच राजकीय पक्षांना धक्का देत विजय मिळवला आहे.

पक्षनिहाय विजयी उमेदवारांचे बलाबल

 * शिवसेना (शिंदे गट): ०५ जागा

 * भाजप: ०२ जागा

 * शिवसेना (उबाठा): ०१ जागा

 * अपक्ष: ०१ जागा

विस्तृत निवडणूक निकाल आणि आकडेवारी

आंब्रड:

झालेले मतदान-6990 , मताधिक्य- ; 2159

दिपलक्ष्मी पडते (शिंदे शिवसेना) विजयी 4505

शेजल परब (उबाठा) 2346


वेताळ बांबर्डे:

झालेले मतदान- 7689, मताधिक्य-  1325 

नागेश आईर (शिंदे शिवसेना) विजयी 4424

बाजीराव झेंडे (उबाठा) 3098

ओरोस बुद्रुक:

झालेले मतदान- 6368, मताधिक्य- 2597

सुप्रिया वालावलकर (भाजपा) विजयी 4394

जान्हवी सावंत (उबाठा)1797

पावशी:

झालेले मतदान- 8123 , मताधिक्य- 22

तुकाराम साईल (शिंदे शिवसेना), विजयी 3936

अमरसेन सावंत (उबाठा) 3914, 

भिकाजी जाधव (वंचित बहुजन आघाडी) 117, 

भानुदास रावराणे (अपक्ष) 47

नेरूर देऊळवाडा :

झालेले मतदान- 7603 , मताधिक्य- 1538

रुपेश पावसकर  अपक्ष विजयी 4475

संजय पडते  (शिंदेसेना), 2937

तेंडोली:

झालेले मतदान- 7802, मताधिक्य- 1438

आरती पाटील (भाजपा) विजयी 4508

 सुजाता गावडे (उबाठा) 3070


पिंगुळी :

झालेले मतदान- 8374, मताधिक्य- 656

गंगाराम सडवेलकर (उबाठा), विजयी 4294

अजय आकेरकर (भाजपा) 3638

गजानन राऊळ (मनसे) 237

घावनळे :

झालेले मतदान- 8680 , मताधिक्य- 984

दीपक नारकर (शिंदे शिवसेना) विजयी 4726

सखाराम खोचरे (उबाठा) 3742

माणगाव:

झालेले मतदान- 8723, मताधिक्य- 410

रुपेश कानडे (शिंदे शिवसेना) विजयी 4403

रमाकांत ताम्हणेकर (उबाठा) 3993

प्रसाद नार्वेकर (अपक्ष) 180

आंब्रड मतदारसंघात माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांनी तेथे नवीन चेहरा असून मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. 

घावनाळे गटात दीपक नारकर यांना चांगल्या प्रतिसाद मिळाला. 984 चे मताधिक्य देत दीपक नारकर यांना विजयी केले.

पावशीत अटीतटीची लढत:

पावशी गटात शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल आणि ठाकरे सेनेचे अमरसेन सावंत यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारी लढत झाली. साईल यांनी केवळ २२ मतांनी निसटता विजय मिळवला. येथे वंचित बहुजन आघाडीच्या भिकाजी जाधव यांना ११७ तर अपक्ष भानुदास रावराणे यांना ४७ मते मिळाली.

ओरोसमध्ये भाजपाची सरशी:

भाजपच्या सुप्रिया वालावलकर यांनी तालुक्यात सर्वाधिक २५९७ मतांचे मताधिक्य मिळवत आपला गड राखला. ठाकरे सेनेच्या जान्हवी सावंत यांना येथे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

 नेरूरमध्ये अपक्ष उमेदवाराचा 'जादू':

नेरूरमध्ये राजकीय पक्षांच्या चिन्हापेक्षा अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांचे वैयक्तिक वलय वरचढ ठरले. त्यांनी १५३८ मतांनी विजय मिळवत शिवसेनेचे संजय पडते यांना धोबीपछाड दिली. 

 ठाकरे सेनेची पीछेहाट :

एकेकाळी कुडाळमध्ये वर्चस्व असलेल्या ठाकरे सेनेला केवळ पिंगुळी गटात विजय मिळवता आला. गंगाराम सडवेलकर यांनी भाजपच्या अजय आकेरकर यांचा ६५६ मतांनी पराभव करत पक्षाची लाज राखली.

दीपक नारकर (घावणळे), रुपेश कानडे (माणगाव), तुकाराम साईल (पावशी), दीपलक्ष्मी पडते (आंब्रड) आणि नागेश आईर (वेताळ बांबर्डे) या पाच शिलेदारांनी विजय मिळवून कुडाळवर निलेश राणे यांच्या शिवसेनेचा प्रभाव अधोरेखित केला आहे. कुडाळमधील या निकालांमुळे आता जिल्हा परिषदेच्या सत्तेची गणिते महायुतीच्या बाजूने झुकली आहेत.