मृतदेह सापडला नाल्यात | एकच खळबळ

Edited by: ब्युरो
Published on: May 09, 2023 13:38 PM
views 551  views

सावंतवाडी : धक्कादायक बातमी... कोलगाव आयटीआयजवळील काजरकोंड येथील नाल्यात मंगळवारी कुजलेल्यास्थितीत एक मृतदेह आढळला. संतोष वासुदेव चव्हाण ( ४२, कोलगाव चव्हाणवाडी ) असे त्याचे नाव आहे.

चार मे रोजी सकाळी नऊ वाजता मोलमजुरीसाठी तो घरातून बाहेर पडला होता. तो चार-पाच दिवसांनी घरी येत असे. चार दिवस उलटून गेल्याने त्याचे नातेवाईक शोध घेत होते. सोमवारी कोलगाव नाल्याच्या परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह ग्रामस्थांच्या नजरेस पडला. तात्काळ या घटनेची माहिती सचिन राणे यांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर याची माहिती चव्हाण कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर मृतदेह संतोष चव्हाण यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनाअंती मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत सावंतवाडी पोलीसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.