नारींग्रेत ओहोळात आढळला युवकाचा मृतदेह !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 25, 2023 19:56 PM
views 115  views

देवगड : रात्री झाेपण्यास शेतमांगरात गेलेल्या नारींग्रे बावकरवाडी येथील मंगेश शांताराम शिंदे(४५) याचा मृतदेह शेतमांगराजवळ असलेल्या ओहाळाच्या पाण्यात आढळला. हा प्रकार मंगळवारी सकाळी ७ वा.सुमारास निदर्शनास आला.

नारींग्रे बावकरवाडी येथील शांताराम बापू शिंदे यांची नारींग्रे सडा गायगाेठण या भागात शेतजमीन असून तेेथे ते त्यांची दाेन मुलांसमवेत शेती करतात. शेतजमिनीतच त्यांचा शेतमांगर आहे. मंगेश शांताराम शिंदे हा त्यांचा मुलगा हा नेहमी नारींग्रे सडा गायगाेठण येथे असलेल्या त्यांच्या शेतमांगरात रात्री झाेपायला जात असे. साेमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे ते शेतमांगरामध्ये झाेपण्यास गेले हाेते. त्यांचे वडील शांताराम बापू शिंदे हे मंगळवारी सकाळी ७ वा.सुमारास शेतमांगराकडे मुलासाठी चहा व नाश्ता घेवून गेले. यावेळी ताे शेतमांगरात दिसला नाही म्हणून मांगराजवळ असलेल्या ओहोळाकडे गेला असेल म्हणून पाहण्यास गेले. यावेळी ओहोळाच्या पाण्यात त्यांना त्यांचा मृतदेह दिसला.

त्यांनी याबाबत तात्काळ गावातील ग्रामस्थांना सांगीतले.ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला हाेता. मंगेश हा अविवाहित हाेता. या घटनेची खबर शांताराम शिंदे यांनी देवगड पाेलिस ठाण्यात दिली असून या पुढील तपास पाेलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.