करुळ येथील महीलेचा शुक नदीत सापडला मृतदेह !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 19, 2024 05:39 AM
views 318  views

वैभववाडी : करुळ दिंडवणे येथील आनंदीबाई मोतीराम पडवळ, वय-७७ या वृध्द महिलेचा मृतदेह आज, ता.१८ सोनाळी येथे शुकनदी पात्रात आढळुन आला.१३ मार्चपासुन ती बेपत्ता होती.

 आनंदीबाई पडवळ या मुलगा राजेश पडवळ यांच्यासोबत वैभववाडी येथे राहत होत्या.१३ मार्चला घरात दवाखान्यात जाते असे सांगुन त्या सकाळी निघुन गेल्या. त्यानतंर मुलगा राजेश हा घरी आल्यानतंर त्याने शहरातील सर्व दवाखान्यामध्ये जाऊन आईचा शोध घेतला. परंतु ती कुठेही आढळुन आली नव्हती. त्यानंतर सायकांळी उशिरा श्री.पडवळ यांनी पोलीसांत बेपत्ताची फिर्याद दिली.

दरम्यान आज दुपारी सोनाळी येथील एका व्यक्तीला सोनाळी येथे शुकनदी पात्रात एका महिलेचा मृतदेह दिसुन आला. श्री.पडवळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर तो आईचाच  मृतदेह असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला.