परप्रांतीय कामगाराचा आढळला मृतदेह..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 05, 2023 11:06 AM
views 348  views

सिंधुदुर्ग ओरोस ख्रिश्चनवाडी चर्च येथील एका घरात बेळगाव येथील प्लास्टर करणाऱ्या कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. मौलाअली इब्राहिम मोकाशी (वय ५०) रा. लोढा खानापूर असे त्यांचे नाव असून तीन दिवसांपूर्वी गावी जातो असे सांगून निघाले होते. मात्र, ते पुन्हा भाड्याने राहत असलेल्या चर्च नजिकच्या घरात आले. काल त्यांचा मृतदेह आला. सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस डायरीत नोंद करण्यात आली आहे.