देवगड समुद्रात बुडालेल्या सहापैकी चार जणांचे मृतदेह सापडले

एकाला वाचवण्यात यश, एक अजूनही बेपत्ता
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 09, 2023 17:40 PM
views 1198  views

देवगड: देवगड समुद्रात बुडालेल्या सहा जणांपैकी चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एकजण वाचला आहे.

प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे अशी चारही मृत झालेल्या व्यक्तींची नावे असून वाचवण्यात यश आलेल्याचे आकाश तुपे असे नाव आहे. तर राम डिचवलकर हा अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.

पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली असताना देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्व उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.