हल्ले परतवून लावलेत, हिंमत असेल तर याच..!

▪️ बबन साळगावकरांचा इशारा ; भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणणारच !
Edited by:
Published on: January 09, 2024 13:09 PM
views 1087  views

सावंतवाडी : आंबोली घाट रस्ता भ्रष्टाचाराचा विषय हाती घेतला तेव्हा अशा गोष्टींना सामोरे जावं लागणार याची जाणीव होती, शेवटी तसंच झालं. मला मारण्याचा कट दोन ठेकेदार व जेईनी रचला आहे‌. परंतु, मी देखील हल्ले परतवून लावलेत याची नोंद त्यांनी घ्यावी. हिंमत असेल तर येवून दाखवावं, त्यांना कसे माघारी ढाडायचं हे चांगलंच ठाऊक आहे असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. तर आंबोली घाट रस्त्याच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा गर्भित इशारा ही दिला.

बबन साळगावकर म्हणाले,  गेली 37 वर्ष आम्ही समाजात काम करत असताना असे प्रसंग अनेकवेळा आलेत. आंबोली घाट रस्ता भ्रष्टाचाराचा विषय हाती घेतला तेव्हा अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार याची जाणीव होती. पंधरा दिवासांपूर्वी सावंतवाडी शहराच्या लगतच्या गावात एका हॉट मिक्स प्लांटवरती एका जेवणावळी वेळी मला मारण्याचा कट रचला गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनीअर हे याचे सुत्रधार आहेत असा आरोप बबन साळगावकर यांनी केला आहे. यात दोन ठेकेदार व इंजिनीअर गुंतलेले आहेत. याची माहिती आपण पोलीस निरीक्षकांना देणार आहे असं ते म्हणाले. 

भ्रष्टाचाराची पाळ मुळ खणून काढण्यासाठी आम्ही आवाज उठवला. गेल्या दहा वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली होती. कोट्यावधीचा भ्रष्टाचार यात झाला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. यामुळेच असे कट रचण्याचे प्रकार केले जात आहेत. मात्र,भ्रष्टाचार उकळून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तर समोरची माणस हल्ला कधी करतात याची मी वाटच बघत आहे. हिंमत, असेल तर त्यांनी यावच ! 2010 मध्ये 35 जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती लोक कशी पळून गेली हे सर्वांना ठाऊक आहे. कट रचणाऱ्यांची मी वाटच बघत आहे. मी नुसतं पाहिलं तरी त्यांच्या पॅन्टी ओल्या होतील असं विधान त्यांनी केल.

दरम्यान, भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई झालीच पाहिजे हा माझा मुद्दा आहे. ती कारवाई ही झालीच पाहिजे. बांधकामच्या दुर्लक्षामुळे आंबोली घाटात अनेक अपघात झाले. लोकांना जीव गमवावे लागलेत. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला नसता तर रस्ते चांगले झाले असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री. केणी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व कागदपत्रे पोलिसांना द्यावीत‌. पोलीस अधीक्षकांनी देखील याची गंभीर नोंद घ्यावी, बांधकामचे डॉक्युमेंट सील करावे. जे अधिकारी यात गुंतलेत त्यांची इडी चौकशी करून त्यांची संपत्ती जप्त करावी अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली. पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केल तर आम्ही न्यायालयीन लढा लढू‌, जिल्हा न्यायालयात आम्ही जावू. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्हा बार असोसिएशनच्या कायदेतज्ज्ञांनी यासाठी आम्हाला  कायदेशीर मार्गदर्शन करावं त्यासाठी त्यांनी पुढं यावं असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.