
सिंधुदुर्गनगरी : शारदीय नवरात्रौत्सव निमित्त जीवन शिक्षण मंदिर कसाल नंबर १ या शाळेत विद्येची देवता श्री देवी सरस्वतीचे आगमन झाले असून मुलांच्या जयघोषात सरस्वतीची विधिवत पूजा करून तिचे आशीर्वाद घेण्यात आला. शालेय स्वराज सभा उप मुख्यमंत्री हार्दिक मालवणकर याच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. मंदार निगुडकर यांनी ही पूजा सांगितली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, माजी अध्यक्ष रवी परब, ग्रा. प. सदस्य संजय वाडकर, शाळेचे मुख्याध्यापक धोंडी चव्हाण, पालक वर्ग, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.