
बांदा : शहरातील सामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी येथील स्मशानभूमी व परिसराची श्रमदानाने साफसफाई करण्यात आली. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी अर्णव स्वार, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, निखिल मयेकर, प्रथमेश गोवेकर, समीर सातार्डेकर, दीनानाथ देसाई, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, बिपीन येडवे, अजिंक्य पावसकर, ज्योतीनंद कुंभार, रितेश नाटेकर, मयुरेश महाजन, गोटू गोवेकर, शुभम पांगम, ओंकार नाटेकर, शांताराम राऊत आदी उपस्थित होते.
मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुक होत आहे. स्मशानभूमीच्या मुख्य इमारतीची तसेच परिसराची साफसफाई करण्यात