खांबाळेत रंगणार हरिनामाचा गजर | ३ डिसेंबरला राज्यस्तरीय भजन स्पर्धा

श्री देवी आदिष्टी जत्रोत्सवानिमित्त आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 25, 2022 11:23 AM
views 371  views

वैभववाडी : खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीच्या सप्ताह तथा जत्रोत्सव ३ डिसेंबरला होत आहे. त्या निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील नामवंत भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.या मंदिरातील भजन स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.


खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव मोक्षदा एकाशीला ३ डिसेंबरला होत आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३ डिसेंबरला ३ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रूपये १५ हजार ५५५ व कायमस्वरूपी चषक, द्वितीय क्रमांकास प्रथम क्रमांकास रोख रूपये १० हजार ५५५ व कायमस्वरूपी चषक, तृतीय क्रमांकास रोख रूपये ७ हजार ५५५ व कायमस्वरूपी चषक, चतुर्थ क्रमांकास रोख रूपये ५ हजार ५५५ व कायमस्वरूपी चषक पाचव्या क्रमांकास रोख रूपये ४ हजार ५५५ व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांजवादकास प्रत्येक १ हजार ५५५ व कायम स्वरूपी चषक देण्यात येणार आहे.


या स्पर्धेत सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील नामवंत १४ भजनी मंडळांना निमत्रिंत करण्यात आले आहे.यामध्ये स्वरधारा भजन मंडळ,तांबोळी,सदगुरू प्रासदीक भजन मंडळ वडखोल,स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ कंलबिस्त,विश्वकर्मा प्रासादीक भजन मंडळ रत्नागिरी,मेजारेश्वर प्रासादीक भजन मंडळ,नागवे,स्वराभिषेक प्रासादीक भजन मंडळ मणेरी,नादब्रम्ह प्रासादीक भजन मंडळ कसाल,स्वामीगंध भजनी मंडळ,राधानगरी,दत्तकृपा प्रासादीक भजन मंडळ वैभववाडी,पावणादेवी प्रासादीक भजन मंडळ,फोंडाघाट,दत्तगुरू प्रासादीक भजन मंडळ वैभववाडी,प्राथमीक शिक्षक कलामंच कुडाळ,मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ नेरूर आणि गजानन प्रासादीक भजन पोंभुर्ले या भजनी मंडळाचा समावेश आहे.


जत्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संपुर्ण कार्यक्रमाला भाविक आणि भजन श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती खांबाळेच्या वतीने करण्यात आले आहे.