
सावंतवाडी : प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्विकारावे याबाबत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत निवेदन देण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी तहसिलदार याच्याकडे ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या समस्या बाबत चर्चा केली. तसेच शासनाच्या योजना ग्रामीण भागात सर्वांना मिळण्याबाबत चर्चा यावेळी केली. तसेच यावेळी दिव्यांग बांधव यांच्या समस्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, मनोज वाघमोरे नियाज शेख अमोल राउल नियाझ शेख आदी उपस्थित होते.