दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत श्री पिंपळेश्वरचा 16 वा वर्धापन 13 एप्रिल रोजी

श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित साईलीला हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार
Edited by: संदीप देसाई
Published on: April 08, 2023 18:37 PM
views 251  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर देवस्थानचा 16 वा वर्धापन दिन येत्या 13 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वा. आरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1.30 वा. महाप्रसाद, संध्याकाळी 5 वा. गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचे भजन, रात्रौ 9 वा. शहरातील नाट्यांकुर कला क्रीडा मंडळाच्या वतीने साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित साईलीला हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.

येथील बाजारपेठेतील या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर देवस्थान उत्सव कमिटीने केले आहे.