
कुडाळ : कुडाळ मध्ये शॉक लागून जखमी झालेल्या धनंजय फाले या युवकाचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. धनंजय फाले याला वीजेचे काम करताना वीज खांबावर शाॅल लागला होता. यानंतर त्याला स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्याची तब्येत बिघडल्याने गोव्यातील बांबुळी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरेच दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.अखेर त्याची आज प्राणज्योत मावळली. धंनजयचे घर माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवाडे येथे आहे.