'तो' निर्णय सुशिक्षित बेरोजगारांसाठी अन्यायकारक : सागर नाणोसकर

Edited by:
Published on: July 11, 2023 17:40 PM
views 105  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजवले आहेत. त्यांनी हे मंत्रीपद हाती घेतल्यापासून असे काही निर्णय घेतले की जे शिक्षक विद्यार्थी यांच्यावर अन्यायकारक आहेत आतापर्यंत त्यांनी मंत्री झाल्यापासून जे अध्यादेश काढले ते सर्व हम करो सो कायदा याप्रमाणेच काढले आहेत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचे कधी नव्हे एवढे बट्ट्याबोळ करून सोडले आहे सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शाळेत रुजू करून घेण्याचा निर्णयही सुशिक्षित बेरोजगांवर अन्यायकारक असा आहे तसेच वाढीव टप्पा अनुदान बाबत विद्यार्थी पटसंख्येची अट तसेच अंशतः अनुदानित शाळा मधील वीस पंचवीस वर्ष ज्यांनी विना मोबदला काम केले त्या शिक्षकांना समायोजना करण्यात अन्याय केला आहे नवीन पुस्तक अध्यापयी शाळांना उपलब्ध नाही अशी दयनीय स्थिती सध्या शिक्षण व्यवस्थेची केसरकारांनी केली आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांनी प्रसिद्धी दिल्या पत्रकात म्हटले आहे श्री नानोस्कर पुढे म्हणाले

मुलांना पुस्तकात वहिच पान देऊन मोठा घोटाळा निर्माण होताना दिसत आहे. पुस्तकातील एका धड्याला एक पान कस पुरेल याचा अभ्यास शिक्षण मंत्र्यांना नसल्याचा दिसुन येत आहे, ओझं कमी करण्याच्या फक्त वल्गना होताना दिसत आहेत कारण कारण वह्या ह्या मुलांना घ्याव्याच लागत आहेत. त्यात कित्येक शाळां अजुनहि पुस्तके, गणवेश पासून वंचित आहेत.

आज शिक्षकांचा मोठा प्रश्न जिल्ह्यात उपस्थित झालेला असताना शिक्षण मंत्री  निवृत शिक्षकांची भरती करण्याचा घाट घालत आहेत शिक्षक निवृत्त का होतो याची जाणीव कदाचित शिक्षण मंत्र्यांना नसणार जे शिक्षक वयोमानानुसार ज्यांना शक्य नसत शिकवणे, प्रवास शक्य नसतो अश्या शिक्षकांना पुन्हा रुजू करणे योग्य नाही आहे तरीही जबरदस्ती त्यांना पुनश्य भरती करणे कितपत योग्य आहे.

त्याव्यतिरिक्त अनेक बी.एड, डि.एड  युवक नोकरी अभावी बेरोजगार आहेत त्यांचा का विचार केला जात नाही हा हि महत्वाचा प्रश्न आज जनतेला भेडसावत आहे अश्या युवकांना कमी पगार देऊन‌ जरी नोकरी देता आली तरी या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो.

पण याची जाणीव जिल्ह्यातील असुनही ‌शिक्षणमंत्री महोदयांना होताना दिसत नाही आहे. अश्या अनेक प्रश्नाबाबत लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न युवासेनेच्या माध्यमातून युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना उपतालुका प्रमुख सोनू गवस यांनी उपस्थित केले‌ आहेत.