आंबोलीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहावर हातावर आहेत 'हे' टॅटू

ओळख पटल्यास साधावा 'या' क्रमांकावर संपर्क
Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 18:57 PM
views 194  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यु मधील मयत एक अनोळखी पुरुष व्यक्ती अंदाजे वय 35 ते 40 वर्षे ज्याचे उजव्या हाताचे मनगटावर वनिता, ॐ, वेशु असे गोंदलेले आहे. मयत हा 21जून 2023 रोजी सकाळी 08:45 चे पुर्वी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात मुख्य धबधब्या पासुन सावंतवाडीच्या दिशेने सुमारे एक किलोमीटरचा अंतरावर सुमारे 150 फुट खोल दरीत मिळुन आलेला आहे. मयत व्यक्तीचे अंगावर असणा-या कपडयांचे वर्णन टी शर्ट एक काळसर, पांढरा, पिवळा पट्टा असलेले हाफ टी- शर्ट असुन टी-शर्टवर डाव्या बाजुचे छातीवर AWADA JEANS CLUB असा पिवळया रंगाचा लोगो आहे. तसेच नेसणीस काळया रंगाची हाफ पॅन्ट आहे. 


अनोळखी मृत व्यक्तीबाबत पोलीस ठाण्यात नापत्ता दाखल असल्यास तसेच मयत व्यक्ती किंवा नातेवाईक यांचेबावत काही उपयुक्त माहिती असल्यास  सावंतवाडी पोलीस ठाणे किंवा खालील अधिकारी व अंमलदार यांच्याशी संपर्क करावा अस आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केल आहे. 


 ऋषिकेश अधिकारी (पोलीस निरीक्षक, सावंतवाडी पोलीस ठाणे) 9552747480

अमित गोते (पोलीस उपनिरीक्षक, सावंतवाडी पोलीस ठाणे ) 8108283838

सुरज पाटील (पोलीस उपनिरीक्षक, सावंतवाडी पोलीस ठाणे)9021310310 मुकुंद सावंत ( पोलीस हवालदार, सावंतवाडी पोलीस ठाणे ) 9422596349 दत्तात्रय देसाई (पोलीस हवालदार, सावंतवाडी पोलीस ठाणे) 9423300330

सावंतवाडी पोलीस ठाणे 02363-272066 यावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.