
सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नं. ७ नं आभार पत्र पाठवल. जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. ७ या शाळेचे छप्पर पूर्णतः मोडकळीस येऊन धोकादायक बनले होते. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे बालकांच्या दृष्टीने होणार संभाव्य धोका टळला आहे. या कामामुळे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानलेत. विद्यार्थी हिताच्या कामाबद्दल त्यांनी दिलेले हे सुंदर आभरपात्र शेअर केल्यावाचून राहवले नाही अशी पोस्ट शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.