
सिंधुदुर्गनगरी : मालपे ते विजयदुर्ग खाडी मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत खुला गट पुरुष मधून ठाण्याचा पार्थ संदीप हातनकर प्रथम, महिलांच्या गटात मुंबईची मिहीका कोलंबेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेंच 5 वर्षाचा रियांश खामकर, 7 वर्षाचे ओजस मोरे, अरूष राणे व माही जांभळे यांनी 15 किमी अंतर 2 तास45 मिनिटात पूर्ण करून सर्वांना थक्क केले. तर 59 वर्षाचे साताऱ्याचे श्रीमंत गायकवाड, यवतमाळचे उदय कोल्हे यांनी 30 किमी अंतर तरुणांच्या बरोबरीने 7 तासा मध्ये पूर्ण केले.
मालपे ते विजयदुर्ग ऐतिहासिक वाघोटण खाडीमध्ये 15 व 30 किलोमीटरची चौथी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली विजयदुर्ग येथील श्री दुर्गा माता कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ यांनी प्रेरणोस्तव समितीच्या सहकार्याने व जिम स्विमिंग अकॅडमी यांच्या नियोजनाखाली आज रोजी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने संघटनेचे अध्यक्ष आनंद माने , सुधाकर शानभाग,सचिव राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. मालपे ते विजयदुर्ग खाडी मध्ये
ह्या स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी विजयदुर्ग गावाचे सरपंच प्रसाद देवधर, मालपे गावचे सादिक मालपेकर, तौफिक मुल्ला, विजयदुर्गचे रविकांत राणे, संजना आवळे, स्पर्धा निरीक्षक श्री आखाडे आणि जिम स्विम अकॅडेमीचे अजय पाठक यांच्या उपस्थितीत मालपे येथे झाले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खुला गट पुरुष- प्रथम क्रमांक पार्थ संदीप हातनकर (ठाणे), द्वितीय क्रमांक रुद्र मनाडे पाटील (कोल्हापूर), तृतीय क्रमांक आदर्श आनंद चैरे (सोलापूर), चतुर्थ क्रमांक सोहम प्रशांत पाटील(ठाणे), पाचवा क्रमांक प्रसन्न गोरखनाथ नंजन(संभाजीनगर)
महिला गट प्रथम क्रमांक मिहीका कोलंबेकर (मुंबई) द्वितीय क्रमांक भार्गवी मुळे (सोलापूर) तृतीय क्रमांक तनवी प्रदीप नवले (सोलापूर) या स्पर्धेचे बक्षीस समारंभ संजना आळवे , प्रदीप साटणकर,रविकांत राणे, बाबू डोंगरे या मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी स्पर्धा निरीक्षक श्री आखाडे स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश कदम, अर्जुन मगदूम, रणजीत शिंदे, सचिन जांभळे यांनी काम पाहिले.