डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘रानरांगूळ’ कथासंग्रहास राज्य पुरस्कार

Edited by:
Published on: October 06, 2025 19:37 PM
views 59  views

ठाणे :  मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘रानरांगूळ’ या कथासंग्रहास ठाणे येथे सुप्रसिद्ध साहित्यिक नीरजा आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथ संचालनालयाचे सहायक संचालक प्रशांत पाटील यांचे हस्ते दि. ५ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. वि.ल. भावे यांनी एकशे तीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने उत्कृष्ट मराठी साहित्यकृतीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात. डॉ विठ्ठल जाधव यांच्या ‘रानरांगूळ’ या वास्तववादी कथासंग्रहास सन २०२४ साठी मेधा दामोदर रोमण पुरस्कृत पुरस्काराने गौरविण्यात आले.

साहित्यिक नीरजा म्हणाल्या की, बदलते वातावरण आपल्या संस्कृतीला मारक आहे. आम्ही सांगतो तेच लिहा ही प्रवृत्ती घातक आहे. तर डॉ. विठ्ठल जाधव यांनी माणूस केंद्रीभूत ठेवून माणूसपणाचे प्रश्न हाताळतो. आम्ही जगतो तेच मांडतो असे पुरस्कारास उत्तर देताना म्हटले. पुरस्कार स्वरूप मानपत्र, पाच हजार, ग्रंथभेट देऊन जाधव यांना सन्मानित केले. यावेळी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, महाराष्ट्र राज्य शासन ग्रंथ निवड समितीचे सदस्य चांगदेव काळे, बालसाहित्यिक बबन शिंदे, नागू वीरकर, मोतीराम राठोड, संकेत जाधव यांचेसह राज्यातील लेखक, कवी, रसिक उपस्थित होते. 




प्रसिद्ध साहित्यिक नीरजा यांचे हस्ते डॉ. विठ्ठल जाधव यांना ठाणे येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.