आताची मोठी बातमी | शासनाच्या नाकावर टिच्चून दोडामार्गात प्राथमिक आरोग्य केंद्राचं ठाकरेंच्या शिवसेनेने केलं लोकार्पण !

उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ठरले बाजीगर | रुग्णसेवा सुरू होईपर्यंत आरोग्य केंद्र इमारतीतच ठाण मांडण्याचा दिला इशारा
Edited by: संदीप देसाई
Published on: February 15, 2023 20:19 PM
views 174  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात नव्याने बांधण्यात आलेल्या साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यास शासन वेळकाडूपणा करत असल्याबाबत आरोप करत बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून  लोकार्पण करण्यात आलं. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गेल्या आठवड्यात प्रशासनाला  नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे तातडीने लोकार्पण करावं, व सर्वसामान्यांची रुग्ण सेवेसाठी होणारी परवड थांबवावी, असे जाहीर आव्हान केलं होतं. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने बुधवारी थेट तमाम शिवसैनिकांना व नागरिकांना सोबत घेत साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच स्वतः बाबुराव धुरी व त्यांच्या टीमने दिमाखात लोकार्पण केलं आहे. इतकंच नव्हे तर प्रशासनाने लोकार्पण झालेल्या या नवीन इमारतीतून आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू करावं यासाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. उद्या पर्यंत प्रशासनाने यांबत ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणास बसण्याचा इशारा धुरी यांनी दिला असून ते लोकार्पण केलेल्या इमारतीतच ठाण मांडून आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथ गेले तीन चार वर्षे प्रदीर्घ कालावधीनंतर अनेक आंदोलन उपोषण करून  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज नवीन इमारतीचे काम अखेर अलीकडेच पूर्ण झाले. मात्र काम पूर्ण होऊनही त्याच लोकार्पण करण्यास जिल्हा परिषद आरोग्य शासन उदासीन होत. त्याच पार्श्भूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला येत्या आठवड्यात त्या पत्नीक आरोग्य केंद्र नवीन इमारतीचे लोकार्पण करण्याचं आवाहन केलं होतं. श्री. धुरी यांनी यासाठी 15 फेब्रुवारी ही प्रशासनाला डेडलाईन दिली होती मात्र ती प्रशासन डेडला न पाळल्याने बुधवारी बाबुराव धुरी व शिवसेनेने या सुसज्ज इमारतीचा स्वतः पुढाकार घेऊन लोकार्पण केलं. नुतन इमारत सर्व सुविधांनी पूर्ण असून त्याची दखल प्रशासन घेत नाही, त्याचा नाहक त्रास पंचक्रोशीतील लोकांना होत होता. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा आम्ही केला आहे, असे यावेळी बाबुराव धुरी यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी त्यांचेसमवेत साटेली भेडशीचे उपसरपंच गणपत डांगी, माजी उपसभापती सुनंदा धरणे, माजी नगराध्यक्षा लीना कुबल, तालुकाध्यक्ष संजय गवस, युवासेनाप्रमुख मदन राणे, श्रेयाली गवस, विनिता घाडी,  संतोष मोरये, संदीप धरणे, शुभम धरणे, श्याम खडपकर, ओंकार कुलकर्णी, सज्जन धाऊसकर, संदेश वरक, संदेश राणे, शशिकांत परमेकर, श्री धरणे, कर्पे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


त्यांनतर रुग्णालयाचे कामकाज सुरू करून रुग्णांना सेवा दिली जात नाहीत.. तोपर्यंत इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा धुरी यांनी घेतला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने अखेर बाबुराव धुरी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल आहे. उद्यापर्यंत प्रशासनाने असंच आडमुठ धोरण ठेवल्यास धरणे आंदोलन उपोषणात रूपांतर होईल, अशी कडक भूमिका बाबुराव धुरी व त्यांच्या शिवसैनिकांनी घेतली आहे.